तिचा हुशारपणा
तिचा हुशारपणा


किती गं बाई तू हुशार
किती गं बाई तू हुशार
माझं घर नेहमी साफ, सुंदर असते
असे सगळ्यांना सांगते,
नोकरांचे क्रेडीट स्वतःच घेते
किती गं बाई तू हुशार,
किती गं बाई तू हुशार
मंडईत जाते फळे, भाज्या घेते
दोन, चार रुपयांसाठी भांडते,
मॉलमध्ये जाते अन तिनशेची
वस्तू पाचशेला आणते
किती गं बाई तू हुशार,
किती गं बाई तू हुशार
मी आहे पदवीधर असे
असे गर्वाने सांगते, अन्
स्वतःची मुले ट्युशनला
दुसरीकडे पाठवते
किती गं बाई तू हुशार,
किती गं बाई तू हुशार
पार्टीमध्ये मैत्रिणींच्या गप्पात
फास्टफूडचे दुष्परिणाम सांगते,
विकेंडला नवऱ्यासोबत गुपचूप
जाऊन पिझ्झा, बर्गर खाते
किती गं बाई तू हुशार,
किती गं बाई तू हुशार
पाच रूपयाची कोथिंबीर
शेजाऱ्यांकडे मागते,
महिन्यातून ऑनलाईन
शॉपिंग हजारात करते
किती गं बाई तू हुशार,
किती गं बाई तू हुशार
सगळ्याच बाबतीत अशी
गं बाई तू हुशार,
किती गं बाई तू हुशार
किती गं बाई हुशार