ति तेव्हा काय करायची
ति तेव्हा काय करायची
ती त्याच्या आठवणीत असायची
तो येण्याची वाट बघायची
एकदा तिने समोर यावं
बघुन असावं
यासाठीच त्याची तिच्या घराभोवती टेहळणी असायची
ही त्याला पाहुन लपायची
आडोसा घेऊन बघायची
तिचा असाही त्रास
त्याला गोड वाटायचा
गालातल्या गालात हसुन
सारं काही सहन करायचा
तिला वाटायच तो त्याच्या मनातलं सांगेल
त्याला वाटायच ती तिच्या मनातलं सांगेल
पण...
मनातलं सांगता येत नव्हतं
सांगायला कुठेतरी भेटता येत नव्हतं
कारण ते गाव छोट होतं
भेटायच अवघड होतं
म्हणून मनातल सांगायचं रहात होतं
मनातल मनातच ठेवून
तो तीला रोज बघायचा
रूसव्या ओठांवर हलकं हसु आणायचा
तिला बघतांना अलगद हळुवार तिरकसपणे
मान हलवून नजरेआड व्हायचा
दोघही न भेटता एकमेकांवर खुप प्रेम कराये
हसण्या बघण्यातुनच
एकमेकांशी बोलायचे
न भेटता न बोलताही
प्रेम होत राहील
तिला बघण्यासाठीच
तिच्या घरावरू चकरा मारण्यात त्याच आयुष्य सरलं
आता ती चिरनिद्रेत आहे
फुलांनी सजवलेल्या फोटोत
आणि तो आजही तिच्या घराभोवती गिरक्या घालतोय
तिचा हसरा फोटो बघण्यासाठी
