STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

थोडं उरलंय

थोडं उरलंय

1 min
11.8K

उरलेत कागद थोडे, अन थोडीच उरलीय शाई

गीत आपले पूर्ण व्हावे, म्हणून मनाची घाई


श्रावणातल्या प्रीतसरींहून, गूढ आपले नाते

वेळ आपल्या भेटीची का, अश्रूंत वाहत जाते


वाट पाहती मीलनाची आपल्या, हे चंद्र, सूर्य, तारे

पाहुनी मला तुझ्याविना गं, कासावीस बघ सारे


बोलावती मजपाशी तुला, अबोल वाणीचे शब्द

का होती ते ही सांग, तुझ्या प्रेमापाशी बद्ध


आयुष्याच्या विरहतीरावर, श्वास माझा तुटतो

तुझ्याविना या वळणावर, तोल माझा सुटतो


गीत माझे पूर्ण करण्या, सांग प्रिये तू येशील का?

स्वप्ने माझी जगण्यासाठी, आयुष्य माझे होशील का?


खरंच सांगतो थोडीच उरलीयं शाई, अन कागदही उरलेत थोडे

लिहिण्यातून अखेरच्या सांग सुटेल का, या जन्मातले तुझे कोडे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance