तेवती ज्योत
तेवती ज्योत
नारी एक रणचंडी भाग्यविधाता
मातृप्रेमाची तू अभिलाषा
धरणी मातेची शक्ती स्वरूपा
करून सागर प्रेमाची परिभाषा
जगत जननी जगत पालक
निःशेष जीवांना जन्मते उरी
तरी गर्भातच होई तिची हत्या
अन कुटील मानसिकतेची शिकारी
चिंध्या झाल्या स्वाभिमानाच्या
या दृष्ट,घृणास्पद पुरुषी विचाराने
आत्मविश्वसाचा बुरुज ढासळला
नराधमांच्या अश्लील नजराणे
लचके तोडण्यास सरसावले हे हात
अन चौफेर वखवखलेली नजर
पाहुनी हे आता रुद्रावतार घेणार मी
जरी झोपले असले हे सरकार
दुर्गा बनूनी संकटाचा सामना करणार
शत्रूस धूळ चारणार बनून रनरागिनी
ना होऊ देणार स्त्रीत्वाची राखरांगोळी
प्रसंगी बनणार कडाडणारी सौदामिनी
