STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

ते प्रेम तुलाही होऊ लागलय

ते प्रेम तुलाही होऊ लागलय

1 min
14.1K


आज काल मन सांभाळताना

नुसतीच उडते त्रेधातिरपीट....

कोणास देऊ मी कौल मनाचा

स्वच्छंदी मन की लाजरे तन

उगाचच सुरू राहते खिटपिट....

रंगसंगती जुळवताना

दोन अनामिक रंगांचं सुत जुळू लागलय

मी तर लाजून कटाक्ष झेललाच

तुझ्या रांगड्या मनातही हळुवार

फूल प्रीतीचा वळू लागलय

एव्हाना वाट चुकवणार पाऊल

आज तुझ्या पाठमोर चालू लागलंय

घेऊन हात हातात तुही बोलून टाक

जे भिनलय माज्यात तुझ्या प्रितीने

ते प्रेम तुलाही होऊ लागलय.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance