स्वप्नात तू
स्वप्नात तू
मला बांधुनी नात्यात
रडतांना तू हसवलेस
डोळ्यात येता झोप
स्वप्नात तू जागवलेस
आपली नव्हती ओळख
आपलेच काही असायचे
भाव नसतांनाही नात्यात
मन तुलाच शोधायचे
शब्दात तुझ्या माझ्या
ओळख जुनी वाटायची
नव्या तुझ्या ओळखीत
स्वप्नात तुला भेटायची
रात्र अजून संपली नाही
डोळ्यात आहे जागली
स्वप्नात घेऊन माझ्या
तुला आठवून झोपली

