STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Others

3  

Ajinkya Guldagad

Romance Others

स्वप्नांत तुझ्या...

स्वप्नांत तुझ्या...

1 min
197

रडत कढत आताशी सखे....लागला मज डोळा.....,

मिटल्या पापण्या तरी चाले..नखरे तुझें सोळा.....

नववारी मऊ केशरी....मिऱ्यांचा तुझ्या घोळ....

चालताना मज हाक मारती... तुझ्या पैंजनांचे बोल..

सावरते अशी गळ्यावरी.....लटकेच तू पदर.....

शहारते अंग माझे...कर माझ्याही जीवाची कदर....

टपोऱ्या उनाड डोळ्यांत तुझ्या....सगळं जग समोर दिसायचं...

जाणून बुजून तुझ्याकडून....त्यात मीच वजा असायचं...

सम्पल्यावर सर्व बहाणे...दोन हृदयाचं मिलन व्हायचं....

अवखळ नदीच जस .. शांत समुद्रात एकवटून जायचं....

आठवत बघ हळूच तुझं....पदराला सोडून देणं....

पाडून पापण्या शेवटी मग ....मला तुझ्यात समावून घेणं.....

शेवटी ,बघितलीच ती स्वप्नपरी...जी सौंदर्याची खान....

अरे कुठे माझी लेखणी....अन कुठे कवितांचे पान....

झालोच बघ घायाळ मी....नखशिखांत आज तुझ्या....

आरे बोलकेच आहेत घाव हे....प्रेमात तुझ्या नि माझ्या....

गालांवरची लट किती बघ.... खोड माझी काढते....

लपुनी ठेवते चेहरा तुझा.....अन ओठ माझे मागते....

कांकणांचा तुझ्या त्या रे....कसा उच्छाद रंगतो...

तुझ्या माझ्या प्रीतीचा जसा....झिम्माच दंगतो.....

केसांतील गजरा तो तुझा....कसा वेणीत न्हाहला....

दंगुनी जीव आज ....पुरता अभंग जाहला....

लाल गुलाबी ओठांचे....अरे किती हे आरोप....

ओठांवर ठेवून ओठ....एकदा घे ना जरासा निरोप....

होउदे ना पुन्हा कधी....भर उन्हात चांदण....

आकाशात तुझ्या माझ्या....नावाचं गोंदण....नावाचं गोंदण..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance