स्वप्नांच्या पलीकडे
स्वप्नांच्या पलीकडे
प्राजक्ताला आला बहार
अंगणात पडला सडा
धुंद झाले हे मन वेडे
उत्साहाचा भरला घडा...१!
अलवार हिंदोळ्यावर
मन बेधुंद माझे झुलते
खट्याळ पवन स्पर्शाने
गाली कोमल कळी खुलते...२!
पानोपानी फुलले फुले
परिसर झाला सुगंधित
दवबिंदू ओघळून मोती
पाहून मन झाले आनंदीत...३!
कोमल फुलपाखरं,भ्रमर
फुला भोवती करी गुंजारव
शोषून फुलातील मकरंद
पाहून धुंद मन होई आरव...४!
बाळ रूपी घरात खेळतो
दुडूदुडू धावत कृष्ण कान्हा
धुंद झाले हे मन पाहतांना
आठवला माझा बाळ तान्हा...५!