स्वप्नांची तुझ्या दुनिया असावी
स्वप्नांची तुझ्या दुनिया असावी
**तुझ्या स्वप्नांची दुनिया असावी त्यात हक्काची जागा असावी**
स्वप्नांची तुझ्या दुनिया असावी, हक्काची त्यात जागा असावी,
स्वप्नांमधील हक्कालाही ,प्रेमाची , तुझ्या झालर यावी
जागेपणीही ध्यास असावा, निद्रेतूनही तूच जागतो,
स्वप्नांची ही दुनिया सारी, मग स्वप्नांना बहर येतो
स्वप्नाच्या त्या वाऱ्यांमधूनी, गंध तुझाच दरवळतो,
गंधाळताना, गंध तुझा, सहवास तुझा नित्य चालतो
वाट हरवते स्वप्नामधली, दाट धुके ही गडद होते,
अंधाराचा ठाव घेऊनी, पणती वाटेवर मिणमिणते.
स्वप्नातील त्या गर्द आकाशी, चंद्र ही जणू पोरका होतो,
चाहूल ही चांदण्यांची, पोरका ही जणू आपला होतो.
फुल जणू हे स्वप्नामधले, पाकळी पाकळी उलगडते,
भ्रमर होऊनी तूच फुलाचा, गंधातच अलगद मिटून जाते.
प्रीती सुखाने बिलगून जाती, स्वप्नातील त्या तरू वेली,
पान पान ही मोहरून जाते, त्या दुनियेची रीतच आगळी
वाट जणू ही स्वप्नामधली, त्या वाटेवरच संपून जाते,
मेघ सावळा असताना, त्या धारेने थबकून जाते.
ध्यास जीवाला गोड असा हा, ओढ जिवाला तूच लावतो
समर्पणाने ओढ लागता, प्रेमाचे हे शिखर गाठतो
मन मंदिरी, हृदय मंदिरी, आभासातही तूच स्मरतो,
तुझ्याविना हे जीवन कसले, तुझ्याविना हा श्वास ही अडतो

