STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

4  

Bharati Sawant

Romance

स्वप्न

स्वप्न

1 min
424

स्वप्नांचे मनोरे मनी रचताना

हात सख्याचा हाती असावा

तुझं-माझं असं करूनी कधी

दोघांतला हेवा-दावाच नसावा


बांधूया घरकुल आपण दोघे

त्यात तू राजा अन् मी राणी 

तू तिथं असावा समिप सदा

गाऊ आपण प्रेमाची गाणी


फिरताना उद्यानात एकांती

परिमळ फुलांचा हा सुटावा

मधुकुंभ प्राशन करतानाही

मृद्गंध दोघांनीच हा लुटावा


पाखरे घरट्यातून उडून जाता

खांदा मज तू आधाराचा द्यावा

आयुष्याच्या अशा कातरवेळी

दोघांनी श्वास श्वासांत भरावा


निष्प्राण देह बांधताना अखेरी

थाट हा अहेवपणाचा असावा

जीवनातील साऱ्या संचितांचा 

साठा तुझ्या काळजात वसावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance