STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

स्वप्न अभंग...!

स्वप्न अभंग...!

1 min
480



स्वप्न अभंग..!

आता आली पाळी ,दयावी हाती टाळी

माय घाम गाळी, पोरासाठी ।।


पोर टोर सारी, लागली कामाला

घेऊन जुमला ,पोटासाठी ।।


येणारा हा चोर ,जाणारा हा थोर

मनी नाचे मोर, सर्वांसाठी ।।


इलेक्शन आली ,जपणूक केली

भावणूक होई , विजयाची ।।


माशीही शिंकली, कशी हो जिंकली

कुस्ती ती निकाली, बेईमानी ।।


म्हणे राज पुत्र ,हेचि एक सूत्र

शुद्ध हो गोमूत्र ,असते की ।।


विषाची परीक्षा, कशास हो घ्यावी

चावी का हो द्यावी, जीवनाची ।।


एकच सेवक ,असा हा लाभला

खराच शोभला, देशभक्त ।।


त्याचेच ठाईस, धरीन वेठीस

चोरांना गाठीस, बांधोनीया ।।


हेच सेवकासी ,सदैव सांगते

स्वातंत्र्य मागते, लोकशाही ।।


जाऊ दे ती पीडा ,उचलला विडा

आनंदाचा सडा ,सांडोनिया ।।


सामोरे जातोय, कामच करून

राहीन उरून, लढोनिया ।।


म्हणे माय लेका, सबुरीने घेऊ

नको गडबड,करावया ।।


लेक येवोनिया,निस्तरील सारे

वाहतील वारे,बिंडोकांचे ।।


लोकशाही रडे,कोपरा धरून

दुःखची करून,थकोनिया ।।


झाली खुप वर्षे,भोगोते मी दुःख

लोकशाही म्हणे,दुःखा वेगे ।।


जाणता माणूस,घेई मनावर

जागे मतदार,करोनिया ।।


आता निकराची,लढाई होईल,

दुःख हे जाईल, पळोनिया ।।


लोकशाही रुक्ष,प्रथम हसेल,

सौख्यच दिसेल,मानवाते ।।


सुखी प्रजाजन,सदैव राहील

आनंद मिळेल,जिंकोनिया ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational