स्वातंत्र्याची पहाट
स्वातंत्र्याची पहाट
स्वातंत्र्याची पहाट उगवली
विश्व शांती अन् समृद्धी ने
शूरवीरांच्या बलिदानाने
वीर साहस पराक्रमाने..!!१!!
गुलामगिरीतून मुक्त होऊनी
उत्सव हा स्वातंत्र्याचा
ध्वजारोहण आज करूनी
स्वाभिमान उंचावू देशाचा !!२!!
सुजलाम सुफलाम देशाचा
प्रणाम माझा देशाला
हरित क्रांतीच्या प्रगतीचा
भारत भूमीच्या या पुञाला !!३!!
संस्कृती अन् परंपरेचा
विविधतेतून नटलेला
त्याग बलिदान शौर्यांचा
प्रणाम करीतो देशाला !!४!!
उंच उंच नभी फडकतो
ध्वज हा भारतदेशाचा
प्रजासत्ताक साजरा करतो
शुभ दिन आज स्वातंत्र्याचा !!५!!
