स्वातंत्र्य बंधन राखी सण
स्वातंत्र्य बंधन राखी सण
स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन सण!
एकाच दिवशी ते अनमोल क्षण!!१
अविस्मरणीय क्षण अनमोल!
देशबंधूभाव सांभाळून तोल!!२
नात्यांत गुंफते ती बंधन रेशमी!
स्वातंत्र्यास्तव तेच जागे नेहमी !!३
बहिणींचे तेच पाठीराखे खरे!
बंध निभावता आयुष्यही सरे!!४
रक्तापलिकडचे तोच जपतो नाते!
देशरक्षणात त्यांचे आयुष्य जाते!!५
एक राखी त्यांच्या साठी पाठवावी!
कृतज्ञता ती प्रत्येक मनाने साठवावी!!६