सूर्यदेवा
सूर्यदेवा
बा सूर्यदेवा सांग न
अजून कितीक तापशीन
तापू तापू काय आमाले
भाजु भाजु मारशीन।।
तुवा पूरा राग काय
इदर्भावरच काढशीन
उनाच्या साऱ्या ज्वाला
आमच्यावरच पाडशीन।।
निर लाई लाई व्हते न
साऱ्या लोकाईच्या अंगाची
पूरी लागते न लेका वाट
आमच्यावाल्या रंगाची।।
कितीक लावाव भाऊ
फेयर अँड लव्हली
फेयर नाई व्हत रंग
अन नाई पडत सावली।।
निऱ्या घामाच्या धारा
दिवसभर राज्या वायतात
फटफटी लावाले सारेच
झाडाची सावली पायतात।।
शेला बांधल्या बगर थ
कोणी निघूच नाई बाहेर
उनाची झळ लागल्याचा
लगेच मियते त्याले आहेर।।
थोडा त लेका धर धिर
आमच्यावाली कर कीव
तूयावाली मुंडी फिरवून
वाचवशीन का आमचा जीव।।
संजय पांडे नागपूर
