सूर लय
सूर लय
तुझे सुर मिळाले
आज माझ्या लयीला
झाले तयार गाणे
शब्द गवसले कवीला ||
प्रत्येक शब्दात आहे
सुगंध तुझ्या मनाचा
प्रत्येक ओळीत आहे
अर्थ तुझ्या प्रेमाचा ||
दरवळ तुझ्या हृदयाचा
नको ग असा पसरवू
होतील किती दिवाणे
मी कोणाकोणास थोपवू ||
तु आहेस फक्त माझी
हे सगळ्यांना कळू दे
तुझ्या भोवतीचे थवे
फक्त आकाशीच विहरु दे ||
नको लावूस आशा
त्या वेडया पाखरांना
आवरणे नसते ग सोपे
बंद पापण्यातील आसवांना ||