सूड
सूड
तुझं माहेर हे लांब, आज गेली आहे तिथं.
मला करमत नाही, रहावं वाटतं नाही इथं.
तुला सोबत सगळे, साऱ्या वळकीच्या जागा.
आपलं नातं हे येगळ, बघ येगळाच धागा.
सखे सोबत तु नाही, गेली एकट्या सोडून.
बघ प्रवास हा माझा, कसा आडला पडून.
तुला आठवीत होतो, असा एकटा बसून.
एक एक दिस सारी, असा कंबर कसून.
तुला भेटण्याची ओढ, बघ लागलिया मला.
आठवण काढितो एवढी, उचक्या लागत्यात तुला.
सखे आनंदी तु रहा, तुला लागू नय नजरा.
तुझं रूप आठ्वितो, केसामंदी आहे गजरा.
तुझ्या डोळ्यांत पाहून, असं हसवील तुला.
कळा येतील पोटात, मग आड्विल मला.
तुझ्यासाठी अट्टाहास, आता जगण्यात माझ्या.
सार सुखं मी पाहीन, त्या चेहऱ्यावं तूझ्या.
तुझा चेहरा तो भारी, कायम ऊभा माझ्या पुढं.
नाय का आठवलं तुला, बुद्धी करते हा सूड

