सुर पारंबी
सुर पारंबी
सुर पारंबीचा खेळ,
आहे किती छान।
पोरं घरात खेळले,
तर येत तुफान॥१॥
माकडासारखा लटकणारा खेळ,
म्हणजे सुर पारंबी।
पोरांना काय माहिती ,
बुर्ज खलिफा किती लंबी॥२॥
ते पोर रमून जातात,
सुर पारंबी च्या वनात ।
खेळता खेळता वेळ,
निघून जातो एका क्षणात॥३॥
एक रिंगण अन,
काठी अन एक वड।
किलबिल पार्टीची सदा,
चालू असते बडबड॥४॥
आजकालच्या पिढीला फक्त,
सुर पारंबीचा माहिती आहे इतिहास।
म्हणून म्हणतो मित्रांनो सूर पारंबीचा ,
नका होऊ देऊ ऱ्हास॥५॥
