सुख ही निसटून जात कधी
सुख ही निसटून जात कधी
जपले सारे भास क्षणिक
सुखाचे कोरीव नक्षीकाम
विरले ते भ्रमधुके क्षणात
अभागी मी अभासी जगात
एक दिवस आणखी वाढला
क्षण निसटत्या वाळूसम
सुखं ही निसटूपाही हातून
पहाते पुन्हा तीच घेते डोळ्यात सामावुन
जपले तुज श्वास होऊनी
जगले तुजसवे तुझीच होऊनी
सारीपाटावरील कवड्या सम
आयुष्य कवडीमोल कधीही
चुकून परततील वाटा पुन्हा या
निसटत्या क्षणांना घे सामावून
जाता जाता एक नजर इथेही
सुखं ही निसटून जात कधी कधी

