STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy Inspirational

स्त्री - एक संघर्ष

स्त्री - एक संघर्ष

1 min
220

स्त्री म्हणजे मानिनी कसली मानिनी?


सतत अपमान झेलणारी


स्त्री म्हणजे दुर्गा


कधीतरीच रुद्रावतार घेणारी


स्त्री म्हणजे पुरुषाची ताकद


त्याची सहधर्मचारिणी


त्याला सर्वतोपरी साथ देणारी


पण हीच स्त्री अबला


सदैव अत्याचार सहन करणारी


सदैव मर्यादा सांभाळणारी


अन् स्वतःचे मत नसलेली कर्तुत्वहीन


कणाच हरवलेली अरे पण वेड्यांनो


याच स्त्रीमुळे तर तुमचा जन्म झाला


याच स्त्रीमुळे तुमच्या


कर्तुत्वला उजाळा आला अशा या


स्त्रीचे उदात्तीकरण करायचे सोडून


तुम्ही तिलाच पायदळी तुडवता


अन् तिची अस्मिता धुळीस मिळवता


हे बरे नव्हे?


तिलाही मान द्या


अन् स्वतःचा उत्कर्ष करा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy