STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Tragedy

3  

Mahananda Bagewadi

Tragedy

स्त्री - अव्यक्त सामर्थ

स्त्री - अव्यक्त सामर्थ

1 min
427

 अहो कुठवर समजुत काढावं

 अन कुठवर स्वतःला जपावं, 

गेलात सोडून मज

 सांगा कसं जगाव? 


जन्मांतराचा संसार 

अर्धावरी संपला, 

सोडुन हाथ माझा 

तुम्ही स्वर्ग गाठला, 


दोन लेकरे कुशित

 सांगा कसं जपावे, 

बापाची ती जागा

 कुठवर मीही घ्यावे,


 हसणार्यांसोबत हसते 

रडणार्यांसोबत रडते, 

काय सांगु तुम्हाला

 मी कसं विरह जपते, 


आपल्या लेकिची वरात 

येऊन थांबली दारात, 

नातेवाईक घरात, 


सांगा......... 

असं कुठवर सहन करावं,

 मनातलं दुःख माझ्या

 कोणासमोर सांगावं, 

तरी जगते मुलांसाठी 

उरात सगळ साठवुन,

 तुम्ही दिलेल्या प्रेमाचं 

प्रत्येक दिवस आठवुन.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy