STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

4  

Prashant Tribhuwan

Inspirational

स्री... एक शिल्पकार

स्री... एक शिल्पकार

1 min
489

जी घडवते आम्हाला ती

स्त्री आहे एक शिल्पकार,

पेरुनी आमच्यात संस्कार

देते जीवनाला आकार!


ती होते कधी जीवन ज्योती

तर होते कधी पथदर्शक सावित्री,

तिच्यामुळेच मिळाली आमच्या हाती

शिक्षण रुपी तेज सुत्री!


बनुनी ती जननी आमची

देते आम्हाला हे मोलाचे जीवन,

तिच्यामुळेच तर मिळते आज

जीवनाला आमच्या संजीवन!


होता ती बहीण आयुष्यात

सर्व दुःख जीवनाचे हरते,

तिच्या प्रत्येक सोनपावलांनी

घरात अमाप आनंद भरते!


बनता ती मैत्रीण आपली

आपले सर्व सुख दुःख जाणते,

जीवनातील प्रत्येक अडचणीत

तीच चेहऱ्यावर हसू आणते!


ती जेव्हा बनते जीवनसाथी

आपले जीवन करून टाकते धन्य,

आपल्या प्रत्येक परिस्थितीत

पाठीशी उभे राहणे करते ती मान्य !


जेव्हा ती मुलगी म्हणून जन्म घेते

सर्व कर्तव्याची जाणिव होते,

दिवा जेव्हा लागतो फडफडू

तीच आपली काळजी घेते!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational