स्पदंन
स्पदंन


हृदयातुन छेडिल्या तारा
त्या स्पंदनांवर विसावल्या
झुळझुळ झोके घेत नभांगणी
उंच उंच त्या आकाशी उडाल्या.
पौर्णिमेचा चंद्रमा ही थक्क झाला
पाहुनी तुझ्या माझ्या ह्या प्रेमाला
श्वासा श्वासा गणी स्पंदने पुकारती
तूच एक आधार ह्या धडकत्या दिलाला.