सोन बहावा
सोन बहावा
सोनेरी पिवळा,
हा सोन बहावा!
सभोवार छान,
ऋतू ही हिरवा!
सोबतीला धुंद;
ही गुलाबी हवा!!
मोहरवणारा मंद;
लाडीक गारवा!!
झुलतो अंबरी;
तो आकाशदिवा!!
फुलांच्या बिछानी,
पडूनी पहावा!
मनातला माझ्या,
घुमता पारवा!
सोबतीला फक्त;
सख्या तूच हवा!!

