STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

4  

Deepali Mathane

Romance

सोड रूसवा सखे.........

सोड रूसवा सखे.........

1 min
302

सोड रूसवा सखे, सोड ना हे बहाणे

गंधाळल्या सांजवेळी, गाऊ प्रीतीचे तराणे।।धृ।।


ये मिठीत अशी तु, माझ्या प्रीतीफुला

कसा सोडवू सखे, तुझा सांग अबोला?

नको असे तुझ्या-माझ्यात, प्रीतवारे वाहणे

गंधाळल्या सांजवेळी गाऊ प्रीतीचे तराणे।।१।।


व्याकूळ मन तुझे, का न समजले मला?

गुंतलो मी असा, उशीर झाला गं मला

रूसव्यातही या दिसे, तुझे गोड लाजणे

गंधाळल्या सांजवेळी गाऊ प्रीतीचे तराणे।।२।।


चांदण्यांची चाहूल देत, काळोख दाटला

ह्रदयीच्या शिंपल्यात, तुझाच मोती साठला

खुलू दे हास्य चंद्रकोर ती पून्हा आज नव्याने

 गंधाळल्या सांजवेळी गाऊ प्रीतीचे तराणे।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance