सोबत तूझ्या जगण्यात...
सोबत तूझ्या जगण्यात...
काय बोलू कसं बोलू, आता सारं ओळखून घे.
दुरावा कितीही झाला, मात्र नित्य आठवणींत तू ये.
अडकलोय असा काही तूझ्यात, की आता बाकी काही दिसत नाई.
जवळ असलो की ओरडतो, लांब गेल्यावर आठव होई.
काय कसं आण किती लिहू, ते तूझ्या बद्दल.
सर्वच काय ते अप्रतिम, मांडतो अकलेची अद्दल.
तू आणी तुझी आठवण, आता सतत सोबत असतात.
प्रेमाच्या आडोश्याला, नक्कीच काही कल्पना फसतात.
कसा विश्वास देऊ तुला, माझ्या निरंतर मनाचा.
कधीच भरलीस जागा माझ्या, जेव्हा योग आला प्रेमाचा.
आबडधोबड लिहिलं तुला, जमेल तसं मांडलं.
लायकी माझी छोटी पडली, लेखणीतून जे सांडलं.
जमेल तसा बनवत गेलो, शब्दांचा मी साचा.
योग्य वेळी आलीस तु, जेव्हा आयुष्याला पडल्या होत्या खाचा.
काय सांगू किंवा लिहू, तूझ महत्व माझ्या जीवनात.
सात स्वरांनी मी न्हाऊन गेलो, सोबत तुझ्या जगण्यात.

