सोबत तुझी...!
सोबत तुझी...!
तुझ्या सोबतीतील प्रत्येक,
क्षणांचे गीत व्हावे...!
गुणगुणत गीत मी,
तुझ्यात लीन व्हावे....!
भारावलेल्या क्षणांनी,
मनी फुलावे प्रेमाचे अंकुर..!
इवल्या इवल्या स्वप्नांनी,
हळूच डोकवावे मनातुन...!
तुझ्या गोड स्पर्शाने,
लाजूनी मी चूर व्हावे....!
तू मात्र बेधुंद होऊनी,
मलाच पहात रहावे......!
अलगद उमलावी कळी,
अन् कळीचे फुल व्हावे....!
आसमंतात सुगंधाने,
ओसंडून वाहावे....!

