संयम
संयम
कोणत्याही क्षेत्रात संयम असतो मोलाचा,
थोडा संयम पाळला तर, भाग होतो सुविचाराचा
समजूतदारपणा हेच, संयमाचं दुसरं नाव,
संयम असतो महत्वाचा,बदलेल आयुष्याचं गाव
संयम न पाळणारी माणसं, आयुष्यात होतात अपघातग्रस्त,
सर्व काही लगेच हवे, घाई घाईमुळे होतात ते त्रस्त
रस्ता व आयुष्याचा प्रवास,धीराने चालणारी होतात यशस्वी,
पुढे जाण्यासाठी, दोन पावलं मागे घेणारी माणसं मनस्वी
