STORYMIRROR

Sarika Jinturkar

Classics

4  

Sarika Jinturkar

Classics

संविधान

संविधान

1 min
1.0K

समता, बंधुता, न्याय,समानता

 लोकहिताचा सर्वस्वी विचार


अहोरात्र कष्ट केले बाबासाहेबांनी बनले संविधानाचे शिल्पकार  

विविधतेतील एकात्मतेला संविधान साक्ष

 आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष  

संविधानाने चाले देशाचा राज्यकारभार


वैचारिक लेखनीचा लाभला बहुमान 

प्रिय असे आम्हाला, भारताचे संविधान 

राष्ट्रीय एकात्मता, अखंडता संविधानाची शान 

विश्वबंधुभाव जगात मिळतो भारताला सन्मान 


शांतीची शिकवण देते भारताचे संविधान  

हक्क, कर्तव्य बजावत 

माणूस, माणूस बनला 

होवून कार्यरत, प्रगतीशील 

उंचावत आहे देशाची मान 

भारतीय राज्यघटनेमुळे 

माणसात माणूस

 विणला गेला आहे छान  


धर्मनिरपेक्षता, समाजवादी 

आहे एकात्मतेचा प्राण 

मानवतेच्या कल्याणासाठी 

जगात भारी आपले संविधान  

या देशाचे नागरिक आम्ही याचा वाटतो अभिमान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics