STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

संसार

संसार

1 min
223

आज सकाळी उगाच वाटे 

का मी गुंतले या संसारी...?


रोज उठूनी तीच धुनी-भांडी 

स्वयंपाकातील इतरांच्या 

आसती आवडी-निवडी


ते कमी म्हणून की

रोजची ती फरपट

ऑफिसची पण घाई

कासावीस जीव होतो बाई


जीवाचा नुसता आटापिटा

कधी-कधी वाटे 

एकटा जीव सुखी राही


पण गोंडस माझ्या दोन

पिल्लांना पाहुनी 

शीण माझा निघून जाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy