#संकल्प
#संकल्प
हिशोब सरत्या वर्षाचा
कसा बेरीज वजाबाकीचा
सुखाबरोबर मैत्री दुःखाची
परीक्षा त्याला सामोरे जाण्याची
पाठलाग तो करावा किती
आनंदाचे क्षण हुलकावणी देती
वाईट अनुभवाने मिळे शिकवण
जपून चालण्या येई शहाणपण
कडूगोड आठवणींना देत उजाळा
संकल्प नव्या वर्षाचा निराळा
प्रा.सौ. नलिनी लावरे
