संघर्ष
संघर्ष
आई..आई बघ अंधार सारून झालंय आता प्रकाश...
भरारी घ्यायला सज्ज मी..खुले झाले बघ हे आकाश..
यश पडले पदरी...गेली ती निराशा..
सांग आपल्या बाबांना पूर्ण झाल्या सगळ्या इच्छा आकांक्षा 😍😍
फिनिक्स पक्ष्या प्रमाणे...राखेतून पंख मी भरवलय...
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
अजूनही आठवते मला..तुम्ही शहारा कडे धाडले होते..
शेत मजुरीचे पैसे देताना..स्वतः cycle घ्यायचे स्वप्नं बाबांनी मातीत गाडले होते...
होते डोळे पाणावलेले...तुझे ते हुंदके पाहून....
समोर येतो बघ तो छोट्या भावाचा अश्रूने भरलेल्या चेहरा ...दाराच्या पाठीमागे उभा राहुन..
तुमच्या सगळ्यांच्या अश्रूंना आज आनंदाने भरवलय...
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
शहरात येताच जणू .. मी परदेशी आली...गावच्या सध्या भोळ्या वातावरणाला... शहराची चमक, जोरदार चपराक मारून गेली..
कसा होणार आपला इथे निभाव..कसा बसणार जम...विचार करून तेवढं निघायचं बघ रोज दम..
चमचम करणाऱ्या त्या वेस्टर्न कपड्यांनी..जणू डोळे दीपावले होते..
भानावर येताच मात्र.....माझ्या फाटलेल्या ड्रेस च्या कोप्र्याला मी चींदी ने लपवले होते...
अंगावर येणाऱ्या वर्दिने आता सगळ्या वेस्टर्न वेर ला धुळीत मिळवलंय..
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आठवते का आई तुला.. शिष्यवृत्ती साठी ची धडपड..
परीक्षेचे पैसे भरायला केली किती पडझड..
पोटाला चिमटा घेऊन मग ..फक्त एकच वेळ जेवायचे..
पिझ्झा बर्गर च्या जमान्यात.. आर्ध्या बिस्कीट पुड्डयावर दिवस काढायचे..
आली होतीस तू भेटायला.. पुरण पोळी घेऊन...
तोंड मात्र मीच गोड केले तुझे..शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमी देऊन..
आनंद अष्रूने भरून मारलेल्या त्या मिठीला..आज पुन्हा डोळ्यात साचवलय..
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आली होती अशीही वेळ..की अपयश ही पदरात पडले होते..
वडिलांना आता कोणत्या तोंडाने सांगायचे..मन ह्याच विचारात गढले होते..
भरली होती बॅग मग..पुन्हा घरी यायला..बस मधून जातांना पडक्या भिडे वाड्या कडे पाहिले होते..
आठवली मग सावित्री माई आणि तिचे कष्ट...कशी ती उन्हात सावली होती...
रातभर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकर वाचून..निराश त्या मनात ऊर्जेची पणती लावली होती😍😍😍
ह्याच सगळ्यांच्या आशीर्वादाने तर आज आयपीएस व्ह्याचा ठरवलंय..
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
होतंय सुरू आता एक नवीन पर्व...
आहे नवीन उम्मीद..कुठेच नाही गर्व..
माझ्या सारख्या अनेक भगिनी.. परिस्थितीशी झुंजताय..
येईल आमचा ही दिवस म्हणून जिद्दीने लढताय..
अश्याच लढणाऱ्या हातांचा आता धाल व्हायचंय...प्रत्येकाच्या मनात आदराने नाव राहील अस कर्तुत्ववान व्ह्याचाय.
काढ दारी रांगोळी आज..कर रोषणाई..म्हणू दे सारा गाव..घर जणू महाला वानी सजवलय..
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉
आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थिती ला हरवलय..🎉🎉