मनातली ती ....!!!
मनातली ती ....!!!
लग्नाच्या पहिल्या 1-2 सालात 'अप्सरा' वाटनारी......कालांतराने जेव्हा 'बायको' बनते,
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
सकाळी चाकरी ला जाताना दिलेल्या 'Flying Kisses' चे रूपांतर जेव्हा चार टोमन्यां मधे होते...
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
प्लेटफार्म वर लागलेल्या 15 डब्बा गाडीच्या गर्दीतही जेव्हा महिला डब्यात नज़र भिर भिरते...
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
Office ला नेहमीच रागाच्या स्वरात खेकस्नारि सहकर्मी जेव्हा नकळत पाहुन गोड हसते...
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
दुपारच्या जेवनात जेव्हा सहकार्याच्या बायकोची भाजी जास्त रूचकर लागते..
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
सायंकाळी बागेच्या कोपर्यात तरुण जोडप्याला पाहुन जेव्हा जलते...
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
घरी थकुन सूटकेच्या निशस्वसाच्या प्रतीक्षेत असताना, जेव्हा दिसभरच्या गार्हन्यांची भड़ीमार पड़ते...
तेव्हा मन मात्र हळूच कुज्बुजते ...हो रे गड्या.. प्रत्येकाच्याच् मनात एक दूसरी 'ती' असते।
असाच दिनक्रम चालु असताना,अचानक एक दिवशी नज़र थबक्ते...
रस्त्याच्या लगत त्या फूटपाथ वर एक अर्धांगिनी तिच्या अजारी नवर्याला 2 घास भरवतांना दिसते..
तेव्हा उर मात्र भरून येतो ,आपल्याच घरची 'लक्ष्मी' डोळ्यांसमोर डाटते..
कितीही भांडली, कितीही रुसलि, तरी 'तीच' पाठीशी उभी असते
आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखात तीचीच साथ असते,
आणि मन मात्र हळुवार पने म्हणते
'हो रे गड्या... प्रत्येकाच्या मनात फ़क्त एकच ती असते.. एकच ती असते'।