IT मधला संघर्ष !!
IT मधला संघर्ष !!
सकाळचे गजर कानावर जेव्हा पडतो..
पुन्हा आला सोमवार आठवून मन आतून रडतो..
शोधत असतो नवा बहाणा ऑफिस ला ना जाण्याचा...
पण करणार काय मित्रांनो..सकाळच्या साखर झोपेला होम लोण चा EMI नडतो ...
रोजचाच हा त्रास...नाही कुठेच हर्ष...
सांग देवा आयटी मध्ये अजून किती संघर्ष..२
ऑफिस च्याच दारात.. झाली आज तिच्याशी नजर भेट..
समोर बघून हसणार ...तेवढ्यात सेक्युरुटी येऊन भिडले थेट...
सिवी देऊन हातात.म्हंटले ...लवकर घ्या Sir Interview, आधीच झालंय late ..
नावं तिचा वाचून आला थोडा दाऊट..
स्टेटस मॅरीद आईकुन.. झालो मी तिथेच आऊट...!
रोजचीच ही निराशा...नाही कुठे हर्ष...
सांग देवा आयटी मध्ये अजून किती संघर्ष..२
इंटरव्ह्यू गेला वाईट...झाली ती निराश...
चेहऱ्यावर हास्य होते...मन मात्र हताश...
सहज म्हणून विचारलं..झाली नव्हती का तयारी..
सावरत स्वतःला ती उद्गारली..सिर आमच्यावर ही असते हो..घरची जबाबदारी..
राक्षसांच्या नजरेतून करावा लागतो हा रोज प्रवास...
घरी पोहचून ही नाही घेता येत हो सुटकेचा निःश्वास..
पोर संभाळण्यापासून स्वयंपाकघरात करावे लागते सर्व काम..
भरून आलेलं मंन..आता मात्र स्वतःहून उद्गारला..
स्त्री तुझ्या ह्या सहन शक्तीला माझा ही सलाम..स्त्री तुझ्या ह्या सहन शक्तीला माझा ही सलाम..
जाता जाता मन तिचाही पुटपुटले असेल...!
रोजचीच ही निराशा...नाही कुठे हर्ष...
सांग देवा आयटी मध्ये अजून किती संघर्ष..२
जेवणाच्या वेळी..आज समोर होती लोकांची घाई..
परप्रांतीय मित्राने आणली होती घरून आपल्या मिठाई...
सर्वांना बघून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला..
आईच्या आठवणीने उर मात्र भरून आला..
सांगत होता घरी गेल्यावर ...सगळे किती लाड करतात..
आज कळतंय म्हणाला....की आईच्या हातचा डब्ब्या पुढे..
हे Swiggy Zomato झक मारत..
रोजचीच ही कहाणी..नाही कुठे हर्ष...
सांग देवा आयटी मध्ये अजून किती संघर्ष..-२
असाच रोजचा दिनक्रम...पुढे सरकत जातो..
अचानक एक दिवस प्रमोशन चा मेल येतो..
स्वप्नं डोळ्यांपुढे नवीन रोज सजू लागतात..
नेहमीच रडणारे ते सहकर्मी आता सहज हसू लागतात..
आयटी मध्येच गड्या...आहे आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा दम...
कंपनी ही गुण गाते...करतो जेव्हा प्रामाणिक परिश्रम..!
अशीही आपली कहाणी..थोडे अश्रू थोडे हर्ष..!!
हो देवा... यशासाठी करावा लागतो थोडा संघर्ष..
