STORYMIRROR

अश्विनी टिळक

Inspirational

3  

अश्विनी टिळक

Inspirational

संघर्ष माझा माझ्याशी!

संघर्ष माझा माझ्याशी!

1 min
236

न जाणो कधीपासून,

चालू आहे सातत्याने!

संघर्ष माझा हा स्वतःशी,

झुंजते आहे नित्याने!।।१।।


कधी करते संघर्ष, 

अस्तित्व जाणण्यासाठी!

तर कधी हा संघर्ष,

अस्तित्व जपण्यासाठी!।।२।।


युद्ध विचारांचे, वविकारांचे

मग मन अन् बुद्धीची जुंपते.

तरी कधी संघर्ष आचारांचा,

त्यात मती माझी खुंटते.।।३।।


जीवन ते मृत्यूचा प्रवास,

वळणवाट खडतर आहे.

अविरत चालत राहायचं हा, 

जगण्याचा संघर्ष मी पाहे.।।४।।


करून थकले हा संघर्ष,

स्वतःशी अन् इतरांशी!

वाटे होऊन जावे एकरूप,

सृष्टीच्या कणाकणाशी।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational