STORYMIRROR

अश्विनी टिळक

Others

4  

अश्विनी टिळक

Others

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज

1 min
412

२७ फेब्रुवारी रोजी झाला

उदय साहित्यसूर्याचा,

कसुमाग्रज नावाने

दैदिप्यरत्न झाला महाराष्ट्राचा ।।१।।


केले निमार्ण अविष्कार

कथा,कविता अन नाटकातून,

झाला साहित्य 'सम्राट'

लाडक्या माय बोलीतून ।।२।।


ज्ञानपीठ सन्मानित

कुलभूषण अवघ्या राष्ट्राचा,

होई साजरा जन्मदिवस

गौरव मराठी भाषेचा ।।३।।


अखेर साहित्य विश्वातील

मोडून पडला 'कणा',

साहित्य अजरामर असे

रसिकांना देत राहील प्रेरणा ।।४।।


Rate this content
Log in