संदेश संक्रांतीचा
संदेश संक्रांतीचा
हल्ली संवादच हरवलाय
समाजातील माणसांचा
नाती जपण्याचे सूत्र
देऊ बोध स्नेह बंधनांचा
कणभर प्रीत तिळाची
गन्ध मनभर मांगल्याचा
घेऊ वसा माणुसकीचा
हाच मान संक्रांतीचा
भुलून दुःख वातावरणाचे
देऊ आलिंगन विवेकाचे
प्रेमभाव जगी सत्याने
कार्य महान सद्भावनेचे
हृदयातील कडवटपणा
पडावा बाहेर आज सर्वांचा
गुळाचा गोडवा चाखताना
स्मरावा क्षण स्नेहमैत्रीचा
गाल बोट ना हिनतेचे
विसरून हेवेदावे द्वेषाचे
वदावे मांगल्याचे ब्रीद
नसावे रोष जातीपातीचे
तीळ अन हलव्याचा गोडवा
गुंफतो एकाच घाग्यात
चूक,भूल,क्षमा,शांतीने
बांधावी घट्ट वीण नात्यात
विसरून कटुता मनातील
हास्याने जपावे नात्यांना
मंगल चिंतनारा संदेश
संक्रांतीला मिळतो जनांना