Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anita Deshmukh

Others

4  

Anita Deshmukh

Others

आई समजून घेताना

आई समजून घेताना

1 min
440


*जो गेला नाही आई नगरी*

*कशी समजेल तया प्रेमनगरी*

*आई विसावले हृदयात तुझ्या*

*जन्माचे भाग्य लाभले तुझ्या उदरी....*१*


*आई समजून घेताना आठवे रमाई*

*पतीधर्म निभावताना गमावले बाळाला*

*कळा पुत्रवियोगाच्या अनंत सोसून*

*जगतकल्याणी ,आई देणं सहनशीता त्यागाला*.....२


*आई झरा रखरखत्या वाळवंटातला*

*तृष्णा शमवी निस्वार्थी ममत्वाने*

*प्रेम सरिता खळखळ वाहताना*

*आटत नाहीं वात्सल्य,भावनेने*...३


*धडपड करी हिरकणी बाळासाठी*

*बुरुज चढून हिमतीने गाठले शिखर*

*संदेश मातृत्वाला, ओढ ममत्वाची*

*जग निर्मितीचा एकच त्यागमय उदर*...४


*आई एक मंत्र,एक धागा,एक ग्रंथ*

*पावित्र्य,चैतन्य,संस्कार टिकवून ठेवणारा*

*एक वटवृक्ष, एक कणा, एक खांब*

*कठीण समयी ताठ उभा राहणारा*....५


*आई पुस्तक सहज वाचता येणार*

*आई अशी शिदोरी जन्माची*

*सरतही नाही, उरतही नाही*

*मर्म काळजातील,साथ स्पंदनाची*....६


*घराची ज्योत सदा तेवत राहणारी*

*आशेने निराशेला सम्पवणारी*

*संसाराची ऊर्जा बळकटीची*

*कळ सोसी नवनिर्मिती करणारी*...७


*अखेरच्या श्वासापर्यंत साथ न सोडणारी*

*ममतेचे सिंदूपात्र शान कर्तव्याची*

*आई नाम जपावे सदा मुखाने*

*भूवरी घावली पंढरी वात्सल्याची*...८


Rate this content
Log in