भीमवंदना
भीमवंदना
*घे भीमराया घे तू माझ्या अंतर्मनाची वंदना*
* *दान संविधानाचे तू दिले बहुजना*
* *घे भिमराया घे तू माझा अंतर्मनाची वंदना*||धृ||
छळत होत्या जातीवादी,विषमतेच्या यातना
दूर केल्या अंतरीचा त्रस्त असलेल्या वेदना
मुक्त केले दास्यत्वाचे पाश सारे तोडुनी
सुखावली जनता अवघी भेदरलेल्या अंधकरातूनी
*घे भीमराया घे तू मुक्ततेचा मानवाची वंदना*||१||
रातंदिन साहून कष्ट मनात विश्व गान तू निर्मिले
हक्क न्यायासाठी जागृत भाव मनामनात तू केले
जातपात, धर्माचे हक्काचे अधिकार अवघे मिळवून दिले
संविधानाची खळखळ वाहणारी गंगोत्री धरणीवर उतरवली
धर्मनिरपेक्षतेचे विश्व गान भारतासाठी लिहिले
*घे भिमराया घे तू बंधुतेची वंदना*||२||
व्याकुळलेली होती जनता पारतंत्र्याच्या तहानेने
स्वातंत्र्याचे अमृततुल्य पेय तू जगास तू प्राशियले
अंधश्रद्धेच्या रूढींवर विज्ञानाचे धडे गिरविले
स्त्रीशिक्षणाची कलम संविधानात हक्क रुजविले
*घे भिमराया घे तू स्वावलंबी नारीची हि वंदना*||३||
लेखणीचे शस्त्र तू चालविले जगतावरी
घटनाकाराचा मान, दान तुझे,उपकार हे भारतीयांवरी
बुद्धी चातुर्याने क्रांतीची मशाल तू पेटविली
एकमेव महामेरू, निस्वार्थीपणा चा मातृभूमीवरी
शिका संघटित होऊन, संघर्ष करण्याचा महामंत्र तू दिला
*घे भीमराया घे तू जागृत साहित्याची ही वंदना*||४||
मतदानाचा हक्क दाविला तू कोटी जना
ज्ञान भंडारा चा ठेवा परोपकारी तुझा बाणा
अहिंसेची गाथा लिहून ठेवली संविधान
कायदेपंडित तुज जैसा, ना भूतो न भविष्यती कुणी होईना
घटनेच्या पानावर चमकला हिरा, बहुमोल खजाना
*घे भिमराया घे तू माझ्या हृदयाची ही वंदना*||५||