STORYMIRROR

Anita Deshmukh

Others

2  

Anita Deshmukh

Others

पानगळ आयुष्याची

पानगळ आयुष्याची

1 min
50

*सळसळत्या पानांची*

*होई कालांतराने पानगळ*

*हरित वल्लरीने दुःखाची*

*कशी सोसावी ही कळ*....१


*वाटसुरू लाही घावे ना*

*विसावा कधी निसर्गाचा*

*ऋतुचक्राची ही पर्वणी*

*खेळ करती आयुष्याचा*.….२


*पानगळ होता आयुष्याची*

*झुंज देई मानव नैराशेला*

*संकट काळी आत्मविश्वासाने*

*द्यावी उभारी नव्या पर्वाला*....३


*झाली पानगळ माणुसकीची*

*माणूस माणसाला मुकला*

*आत्मीयता, आपुलकीचा झरा*

*कसा स्वार्थापोटी आटला*....४


*बंधुतेचा गेला गारवा*

*क्रोध,कपट, द्वेषाचा आला उन्हाळा*

*प्रेममय, निष्पाप ,भावनांचा*

*कसा साजरा करावा सोहळा*...५


*प्रेम,सहिष्णुता,बंधता*

*ना मैत्री,ना उरला सदाचार*

*हळहळ झाली नात्यांची*

*केव्हा वसंत निःस्वार्थी फुलणार*....६


*बहरेल वटवृक्ष का माणुसकीचा*

*जुळतील कधी ऋणानुबंध*

*मानव बनला जगी दानव*

*बंधुतेचा दरवळेल का सुगंध*...७


Rate this content
Log in