STORYMIRROR

Anita Deshmukh

Others

3  

Anita Deshmukh

Others

ओढ तुला भेटण्याची

ओढ तुला भेटण्याची

1 min
316

ओढ तुला भेटण्याची

क्षणात होते बावरी

तुझ्या येण्याच्या वाटेला

नजर होते कावरी...१


  ही मनाला हुरहूर

  कधी भेटशील मला

  नयन झाले व्याकुळ

  साद ही घालते तुला...२


तुझ्या पाऊल खुणांचा

भास होतो या श्वासांना

अतुरलेल्या मनाला

भास तुझ्या इशाऱ्यांचा....३


तुला भेटण्यास झाले

अधर हे वेडेपिसे

तुझ्या गोड भेटीसाठी

घेतसी मन उसासे...४


   होता नभी सांजवेळ

  वाढे ओढ मिलनाची

  स्वप्न सुखवती जणू

  सृष्टी सजली प्रितीची...


Rate this content
Log in