तुला कळणार नाही
तुला कळणार नाही
1 min
140
तुला कळणार नाही
व्यथा हळव्या मनाची
किती घाव विरहाचे
तूच हाक अंतरीची...१
किती वेदना असह्य
बाळा साहल्या जीवनी
जोजवते रे अंगाई
काळजाच्या ह्या दोरीनी---२
तुला जपले डोळ्यांत
केला हाताचा पाळणा
तुझ्या सुखासाठी त्याग
किती सोसल्या यातना....३
सुखी व्हावा बाळ राजा
हीच हाक ममतेची
क्षण दुःखाचे न लाभो
होवो पहाट सुखाची....४
माया वेडीच आईची
तुला कळणार नाही
जरी जगाचा तू स्वामी
मोल ममतेला नाही---५
