समर प्रीतीचे
समर प्रीतीचे
एकांती चुंबुनी घे हळूच गाल माझे
ओठांमध्ये ओठ घे नाजूक लाल माझे
दुरावा पुरे हा पुरे हे बहाणे झाले
मिठीत घेवुनी जाणना सुंदर हाल माझे
वीणा मी रे छेडून घेत तारांना तू
स्पर्शाने बघ जुळती सूर ताल माझे
जरा दूर कर अडसर मधले तुझ्या माझ्या
मिलनामध्ये नको पुराने खयाल माझे
पावसात भिजव अंग तरंग प्रेमाने तू
चुंबनाने उजळून आले कपाल माझे
जलधारांची वाट किती मी पाहू आता
कसे तापले, अंगण झालेय लाल माझे
झुकले अंबर प्रेमात तुझ्या धरणी बोले
नयनांमधे, स्वप्ने आहेत कमाल माझे
अमर समर ते आज प्रीतीचे घडले परंतु
जिंकली प्रीती, मीपण झाले हलाल माझे

