समाजाचे शिल्पकार...
समाजाचे शिल्पकार...
समाजाचे शिल्पकार "पुष्पाग्रज " फुले,आंबेडकर,शाहूंचा.... महान वारसा जपणारा, समाजोध्दाराचं पवित्र कार्य करणारा... मानवता,बंधुता शिकवणार प्रत्येकात मूल्ये रुजवणारा, राष्ट्रभती,एकात्मता जोपासणारा... अज्ञान,अंधकार दूर करणारा, सदविचार,सदवर्तन देणारा ज्ञान,संस्कार वाढवणारा थोर,महात्म्यांचे आदर्श रुजवणारा... आदर्शवत आचरण करणारा, राष्ट्रहित,समाजकार्याला वाहून घेणारा जीवनोध्दार करणारा... अत्याचाराविरुध्द पेटून उठणारा क्रांतीची मशाल पेटवणारा ज्ञानाम्रूत पाजणारा चदनासम झिजणारा... परिस तो सोनं करणारा, त्याची गाया,थोरवी,महती नाही जन्म हा पुरणारा... ज्ञानसागरात तो तरणारा स्वंयप्रकाशित तो तारा..! या समाजाचा शिल्पकार- माझा शिक्षकच खरा... माझा शिक्षकच खरा...! गायकवाड रविंद्र गोविंदराव दापकेकर जि.नांदेड 9834298315
