STORYMIRROR

Dipak Deshpande

Inspirational

5.0  

Dipak Deshpande

Inspirational

सलाम सैनिक हो

सलाम सैनिक हो

1 min
15K


देशरक्षणा जीवन ज्यांनी घालविले

देशरक्षणा प्राण ही ज्यांनी गमविले

सैनिक होऊनी रक्षण केले

अशांना माझा सलाम हो।।


राष्ट्र हितासाठी लढा दिला

सीमेवर कडेकोट पहारा केला

घाम गाळला, त्रास झेलला

अशांना माझा प्रणाम हो ।।


शुभ्र हिमावर जयांचे रक्त सांडले

तयांच्या संसाराचे वाटोळेही झाले

नातेगोते समर्पित देशसेवेत झाले

अशांना माझे वंदन हो।।


राष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी कष्टही झेलले

तहान भूक सारे विसरले

रात्रंदिवस जागले

अशा वीरांना नमन हो।।


उन वारा पाऊस थंडी

सारी अंगावर काढली

तरी अमुच्या हिंदुस्तानी गड्यांनी हिंमत नाही हारली

त्यांनाच अपुल्या सुखदुःखाची सवंगडीही बनविली

अशा देशभक्तांना सलाम हो।।


लाज राखण्या तिरंग्याची

स्वारी चालली लढण्यासाठी

हातात जरी शिल्लक काठी

परी गडी नाही लटपटला वाटी

अशा शुरविरास मुजरा हो।।


जेव्हा शत्रूंचा हल्ला झाला,

सख्यासोबत्यांच्या रक्ताचा

सडा पडू लागला

परी खंबीरतेने देऊन लढा

युद्धही जिंकला

अशा सैनिकास माझा प्रणाम हो।


सैनिका नाही जबाबदारी आता

देशवाटचालीत साऱ्यांनी उचलावा खारीचा वाटा

तेव्हाच सुजलाम सुफलाम

होईल भारतमाता

अशा देशभक्तांना माझा सलाम हो।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational