काल..
काल..
आज मी माझीच प्रगती पाहीली।।
काल..
कालपर्यंत मी मलाच शोधत होतो
शिकलेल्यांच्याच गर्दीतला एक मानत होतो
आपल्या देशात अशिक्षीत आहेत समजत होतो
पण
शिकलेल्यांनाच शिकवणारे प्रत्यक्ष बघत होतो
शिक्षण घेऊनही लाचार झालेल्यांच्या समोर होतो
बेरोजगारीची व्याख्या स्वतःच बदलत होतो
म्हणूनच,
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
शिक्षणानेच मानवाची प्रगती शक्य आहे
ह्या वचनांवरचा विश्वास संपला आहे
आणि,
शिकलेले लोक पकोडे तळतील
पानटपऱ्या लावतील तर ते यशस्वी होतिल
अशी विधाने ऐकायला मिळतील
मग,
सगळ्यांना कळेल शिक्षण कशासाठी
वास्तविकतेची जाण करण्यासाठी
की वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी
मात्र,
शिक्षणाची कदर होत नाही म्हणत या देशात
मायबापांना ठेवून इथेच मार्गस्थ होतात विदेशात
पैसा संपत्ती तेथे खोऱ्याने जमवतात
तेंव्हा ,
आपली बुद्धी गहाण ठेवणारे देशवेडे
माघारी परतून गातात विदेशाचे पोवाडे
माझे मायबाप सरकार नतमस्तक त्यांच्यापुढे.
आता,
अजून काय गायचे गीत विजयाचे
कष्टकरी मायबापांच्या श्रमाचे
राबराबुन गाळलेल्या घामाचे.
