स्कंदमाता
स्कंदमाता
कुमार कार्तिकेय काखेत घेऊन बसली
दुर्गेला 'स्कंदमाता' अशा नावाने ओळखली ।। धृ ।।
पाचव्या दिवसाला पिवळे वस्त्र परिधान
रूप सुंदर पाहुनी होई भक्ता समाधान
उत्साह वर्धक असा हा पिवळा रंग छान
पिवळ्या रंगाचे चैतन्य कलावती जाणली ...दुर्गेला स्कंदमाता अशा नावाने ओळखली ।। १ ।।
सिंहारूढ बसणारी स्कंदमाता पुत्रवती
प्रेम स्वरूप वात्सल्याचे प्रतीक मायावती
अधिष्ठात्री दुःख हारिणी भक्तां करुणावती
चतुर्भुजा देवी पिवळ्या फुलांनी सजवली.....दुर्गेला स्कंदमाता अशा नावाने ओळखली ।।२ ।।
स्कंदमाता जगी सुखदायी भक्तांसाठी आई
उपासना,साधना फल शक्ती प्रेरणादायी
परम सुख शांती भक्तां पुरवी इच्छा माई
पिवळ्या वस्त्रानी, फुलांनी देवीला मढवली......दुर्गेला स्कंदमाता अशा नावाने ओळखली ।। ३ ।।
