सखी
सखी
ए सखी ऐक ना,
तू क्षितिजाकडे झेप घे, स्वप्नांना तुझ्या कवेत घे.
हवा तसा तुझ्या आयुष्याच्या,
पूर्णत्वाला तू आकार दे..!
कधी हो अल्लडं, कधी बालिश,
बालपण ते जपून ठेव.
हवे तसे मुक्तपणे तू,
जग थोडे विहरून घे.
फक्त 'आजचाच दिवस नाही',
वर्ष ही हे तुझं चं आहे.
म्हणूनच म्हणतेय तोड पाश,
बंदिनी तू होऊ नको.
सार्या जगात तुझ्याच,
अस्तित्वाचा तू ठसा उमटव..
कारण तू पूर्ण आहेस स्वतःसाठी..!!