STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

3  

Gangadhar joshi

Romance

सखी

सखी

1 min
298

भरजरी पोशाख माझा

जरतारी ते राहणे

गाशील का माझ्यासवे

सखी पूर्वीचे ते गाणे ।।


ना रोष ना दोष 

ना नाराजी मनीची

विसरुनी जा झाले गेले ते

ती खंत माझ्या ऊरीची

उठती काहूर अंतरातून

गाऊ कसे ते तराने

गाशील का सखे तू पूर्वीचेच गाणे


काळ सरला वेळ सरली

सरल्या त्या पाऊल खुणा

एकदाच समजून घे ना 

माझ्या जिवाच्या वेदना

तूच कामिनी तूच यामिनी

अनवाणी ते चालणे  ।।


भिजलो आपण कैकवेळा

श्रावणाच्या त्या सरीने

शांत झाली श्रांत झाली

तृप्त ती धुंद अवनी


गन्ध मधुर हा मंद बेधुंद

पूर्वीचे ते वागणे


विनवितो परत एकदा

गात रहा तू गाणे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance