STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

सखी

सखी

1 min
576


तूच माझ्या जीवनी

नाही दुसरी कोणी

पाहिले तुला ज्याक्षणी

ठसलीस माझ्या मनोमनी


दिवसरात्र होतो बेचैन

कुठे ही लागत नाही मन

सारखा फिरत असतो वणवण

तुझ्या विना व्यर्थ आहे जीवन


मनात केला पक्का विचार

तुझ्यासंगे करू या विहार

उभारू आपला घरसंसार

त्यासाठी करू कष्ट अपरंपार


तुला जे हवे ते देईन मी

तुझ्यासाठी काही करेन मी

आकाशातील चंद्र तारेच काय

तळपता सूर्य ही तोडून आणेन मी


आवडत्या सखीच्या आनंदासाठी

सुखी संसाराच्या जीवनासाठी

तिच्या प्रत्येक हालचालीसाठी

माझे जीवन फक्त तुझ्याचसाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance