सखे
सखे
शब्द माझे अडखळले
अडखळले माझे मन ,
थकून गेलेत गं आता
आता माझे भोळे नयन !!
सांग कधी येणार सखे
सखे तुला भेटावे वाटे ,
पाहताक्षणी तुला मनी
मनी फार आनंद दाटे !!
लागे नेहमी हुरहूर
हुरहूर माझ्या मनाला ,
होईल मजला आनंद
आनंद त्या एका क्षणाला !!
जेव्हा कधी तू भेटशील
भेटशील सखे तू मजला ,
नाही जाऊ देणार कधी
कधी ना दुरावी तुजला !!

